दुर्मीळ देवस्थान01Uttara Kannadaदुर्मीळ देवस्थान · Uttara Kannadaभेट मार्गदर्शकIdagunji Mahaganapatiसुमारे १५०० वर्षं जुनं कर्नाटक किनारपट्टीवरचं मंदिर. या मंदिरात गणपतीची द्विभुज उभी मूर्ती आहे. हातात कमळ आणि मोदक आहे.यात्रा पाहा →
दुर्मीळ देवस्थान02Puducherryदुर्मीळ देवस्थान · Puducherryभेट मार्गदर्शकManakula Vinayagar, Puducherryपुदुचेरीच्या विदेशी वसाहतींपेक्षाही जुनं असलेलं हे मंदिर समुद्रकाठी आहे. ते हटवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण तरीही ते आजपर्यंत टिकून राहिलं. सोन्याचा कळस आणि विनायकाच्या ४० चित्रित रूपांसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.यात्रा पाहा →
दुर्मीळ देवस्थान03Ujjainदुर्मीळ देवस्थान · Ujjainभेट मार्गदर्शकChintaman Ganesh, Ujjainउज्जैनमधलं सगळ्यात जुनं आणि मोठं गणेश मंदिर, जिथं सर्व चिंता दूर करणारा देव म्हणून एकाच वेळी गणपतीची चिंतामण, इच्छामण आणि सिद्धिविनायक या तीन रूपात पूजा केली जाते.यात्रा पाहा →
अज्ञात गणेशस्थान04Udupiअज्ञात गणेशस्थान · Udupiभेट मार्गदर्शकGuddattu Vinayaka, Kumbhashiखडकातल्या गुहेतला स्वयंभू गणपती, कधीही न आटणाऱ्या नैसर्गिक झऱ्यात अर्धवट बुडालेला कर्नाटक किनारपट्टीवरचा दुर्मिळ जलगणेश.यात्रा पाहा →
अज्ञात गणेशस्थान05Bastarअज्ञात गणेशस्थान · Bastarभेट मार्गदर्शकDholkal Ganesha, Dantewadaबैलाडीला पर्वतरांगेत ३,००० फूट उंच शिखरावर विराजमान असलेलं आणि ग्रॅनाइट पाषाणातलं हजार वर्षं जुनं गणेश मंदिर आहे. या ठिकाणी केवळ जंगलातला ट्रेक करूनच पोचता येतं. हे भारतातलं सर्वात विलोभनीय आणि तरीही फारसं ज्ञात नसलेल्या गणेश मंदिरांपैकी एक आहे.यात्रा पाहा →
दुर्मीळ देवस्थान06Sivagangaदुर्मीळ देवस्थान · Sivagangaभेट मार्गदर्शकKarpaka Vinayakar, Pillayarpattiखडकात कोरलेल्या भारतातल्या सगळ्यात जुन्या गणेश मंदिरांपैकी एक, इथं सातव्या शतकातली ६ फूट वलंपुरी विनायकाची मूर्ती आहे. तसंच गुहेत जुने तमिळ शिलालेख आहेत.यात्रा पाहा →
दुर्मीळ देवस्थान07Jaipurदुर्मीळ देवस्थान · Jaipurभेट मार्गदर्शकGarh Ganesh, Jaipurजयपूरचा रक्षणकर्ता गणेश. अरवली टेकडीवरच्या मंदिरात बालरूपातली मूर्ती विराजमान आहे. राजाला आपल्या राजवाड्यातूनच दर्शन घेतमा यावं, अशा प्रकारे या मंदिराची रचना करण्यात आली आहे.यात्रा पाहा →
अज्ञात गणेशस्थान08Vijayanagaraअज्ञात गणेशस्थान · Vijayanagaraभेट मार्गदर्शकKadalekalu Ganesha, Hampiहंपीच्या जागतिक वारसा अवशेषांमधल्या हेमकुटा टेकडीवर एकाच दगडातून कोरलेला १५ फूट उंच गणपती. हरभऱ्यासारख्या पोटामुळं हे नाव पडलं आहे.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग09Raigadलोकप्रिय यात्रामार्ग · Raigadभेट मार्गदर्शकBallaleshwar, Paliअष्टविनायक मूर्तींमधली अशी मूर्ती जिला गणपतीच्या नावाऐवजी बल्लाळ या भक्ताच्या नावावरून ओळखलं जातं.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग10Ahmednagarलोकप्रिय यात्रामार्ग · Ahmednagarभेट मार्गदर्शकSiddhivinayak, Siddhatekभीमा नदीकाठच्या टेकडीवरचं दुसरं अष्टविनायक मंदिर. मधू-कैटभ राक्षसांना हरवण्याआधी विष्णूनं इथं गणपतीची पूजा केली, असं मानलं जातं.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग11Puneलोकप्रिय यात्रामार्ग · Puneभेट मार्गदर्शकMahaganapati, Ranjangaonअष्टविनायक यात्रेतलं हे शेवटचं तीर्थक्षेत्र. त्रिपुरासूर राक्षसाशी लढण्यापूर्वी भगवान शिवानं गणेशाच्या याच रूपाची पूजा केली होती, असं मानलं जातं.यात्रा पाहा →
दुर्मीळ देवस्थान12Chittoorदुर्मीळ देवस्थान · Chittoorभेट मार्गदर्शकKanipakam Sri Varasiddhi Vinayaka Swamy Templeबाहुदा नदीकाठी असलेली गणपतीची एक स्वयंभू मूर्ती. जिचा आकार अजूनही वाढत असल्याची भाविकांमधे श्रद्धा आहे. देवाच्या साक्षीनं शपथ घेऊन पारंपरिक पद्धतीनं इथं वाद मिटवले जातात, हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे.यात्रा पाहा →
अज्ञात गणेशस्थान13Sawai Madhopurअज्ञात गणेशस्थान · Sawai Madhopurभेट मार्गदर्शकTrinetra Ganesh Temple, Ranthambore Fortरणथंबोर किल्ल्यातला त्रिनेत्र गणपती. भारतातलं हे एकमेव असं मंदिर आहे, जिथं भाविक लग्नपत्रिका पोस्टानं पाठवतात.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग14Puneलोकप्रिय यात्रामार्ग · Puneभेट मार्गदर्शकMoreshwar, Morgaonअष्टविनायक तीर्थयात्रेतलं पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं ठिकाण. पुण्याजवळच्या किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या मंदिरात गणपतीची स्वयंभू मूर्ती इथं विराजमान आहे.यात्रा पाहा →
अज्ञात गणेशस्थान15Kasaragodअज्ञात गणेशस्थान · Kasaragodभेट मार्गदर्शकMadhur Mahaganapathi Templeमधुवाहिनी नदीकाठचं केरळ शैलीतलं गणेश मंदिर. एका साधूनं अर्पण केलेलं अन्न वाढत गेल्यावर देवानं इथंच वास्तव्य करायचं ठरवलं, अशी कथा या देवस्थानाच्या अनुषंगानं प्रसिद्ध आहे.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग16Puneलोकप्रिय यात्रामार्ग · Puneभेट मार्गदर्शकShreemant Dagdusheth Halwai Ganpatiपुण्यातलं अतिशय लोकप्रिय देवस्थान. १८९३ मधे एका दुःखी मिठाईवाल्यानं या मंदिराची स्थापना केली. या मंदिरातील गणेशमूर्ती लोकमान्य टिळकांच्या सार्वजनिक गणेशोत्सवात सन्मानित करण्यात आलेल्या पहिल्या काही मूर्तींपैकी एक आहे.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग17Raigadलोकप्रिय यात्रामार्ग · Raigadभेट मार्गदर्शकVaradavinayak, Mahadखोपोलीजवळ असलेलं अष्टविनायक मंदिर. इथली मूर्ती स्वयंभू आहे. या श्रद्धास्थानाचं नाव वरद विनायक आहे. कारण मनापासून भक्ती करणाऱ्यांना ती वदरान देते, असं म्हटलं जातं.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग18Puneलोकप्रिय यात्रामार्ग · Puneभेट मार्गदर्शकGirijatmaj, Lenyadriअष्टविनायकांपैकी एकमेव मंदिर जे बौद्ध लेण्यांमधे कोरलेलं आहे. जुन्नरजवळ असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी तीनशे पायऱ्या चढून जावं लागतं.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग19Puneलोकप्रिय यात्रामार्ग · Puneभेट मार्गदर्शकVighnahar, Ozarकुकडी नदीकाठी सोनेरी कळसाचं अष्टविनायक मंदिर आहे. विघ्नासुराचा नाश करणारा विघ्नहर म्हणून गणपतीची पूजा केली जाते.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग20Mumbaiलोकप्रिय यात्रामार्ग · Mumbaiभेट मार्गदर्शकSiddhivinayak Templeभारतातलं सगळ्यात जास्त भेट दिल्या जाणाऱ्या मंदिरांपैकी एक. छोट्या ग्रामदेवतेपासून आता लोकप्रिय आणि श्रद्धेचं प्रतीक बनलेलं एकोणिसाव्या शतकातलं मंदिर.यात्रा पाहा →
दुर्मीळ देवस्थान21Tiruchirappalliदुर्मीळ देवस्थान · Tiruchirappalliभेट मार्गदर्शकUchi Pillayar Temple, Rockfortतिरुचिरापल्लीच्या प्राचीन रॉकफोर्टच्या शिखरावर असलेलं गणेशाचं हे मंदिर आहे. पृथ्वीवरच्या सर्वात जुन्या उघड्या पडलेल्या भूगर्भीय रचनांपैकी एक मानला जाणाऱ्या खडकावर हे मंदिर आहे.यात्रा पाहा →
लोकप्रिय यात्रामार्ग22Puneलोकप्रिय यात्रामार्ग · Puneभेट मार्गदर्शकChintamani, Theurमुळा-मुठा नदीकाठचं पेशवेकालीन अष्टविनायक मंदिर. जिथं गणपतीनं कपिल ऋषींना चिंतामणी रत्न मिळवून दिलं, अशी आख्यायिका आहे.यात्रा पाहा →